नामपूर येथील देवीभक्तांची पदयात्रा
By Admin | Updated: October 15, 2016 00:31 IST2016-10-15T00:22:51+5:302016-10-15T00:31:23+5:30
नामपूर येथील देवीभक्तांची पदयात्रा

नामपूर येथील देवीभक्तांची पदयात्रा
नामपूर : परिसरातील लाड शाखीय वाणी समाजातील १११ देवीभक्त दरवर्षी पदयात्रा करत १६ कुलस्वामिनींच्या दर्शनासाठी जातात. नामपूर, वडनेर, खाकुर्डी, रावळगाव येथील हे देवीभक्त शेकडो मैलांचा पायी प्रवास
करत देवींचे दर्शन घेऊन घरी परतात.
या पदयात्रेचे हे सहावे वर्ष होते. अन्नपुर्णा, जोगेश्वरी, मठान्ना, सुलाई, आशापुरी, मनुमाता, एकवीरा आदि कुलस्वामिनींचे दर्शन घेऊन येथील भाविक घरी परतले आहेत. एकमेकांतील प्रेमभाव वाढावा व सामाजिक एकोप्याची वृद्धी व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पदयात्रेच्या प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी महाआरती, जोगवा, देवी सप्तशती पाठांचे वाचन, कुलस्वामिनी, नामजप आदि कार्यक्रमांचे दैनंदिन आयोजन केले जाते.
अनेक ठिकाणचे भाविक पदयात्रेतील भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था करतात. रात्रीच्या आरतीमध्येही सहभाग नोंदवतात.
प्रवास काळात दुर्गा जप, टिपऱ्या, भक्तिगीते, मातेचा नाम जप आदि कार्यक्रमांमुळे पदयात्रा सुकर होते. (वार्ताहर)