ट्रकच्या धडकेत पादचारी तरुण ठार
By Admin | Updated: May 19, 2014 16:29 IST2014-05-19T00:38:12+5:302014-05-19T16:29:06+5:30
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील मराठी शाळेजवळ ट्रकने धडक दिलेल्या इसमाचा उपचारादरम्यान रविवारी दुपारी मृत्यू झाला़

ट्रकच्या धडकेत पादचारी तरुण ठार
कान्हेगाव मराठी शाळेजवळील घटना
नाशिक : कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील मराठी शाळेजवळ ट्रकने धडक दिलेल्या इसमाचा उपचारादरम्यान रविवारी दुपारी मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, विलास रावसाहेब मुळे (२३, रा़ कान्हेगाव, ता़ कोपरगाव, जि़ अहमदनगर) हा रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कान्हेगावच्या मराठी शाळेजवळून पायी जात होता़ त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली़ या धडकेत जबर जखमी झालेल्या मुळेला त्याचे वडील रावसाहेब मुळे यांनी प्रथम शिर्डी संस्थानच्या दवाखान्यात दाखल केले; मात्र प्रकृती बिघडल्याने त्यास अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ़ देवरे यांनी घोषित केले़ दरम्यान, या घटनेची कोपरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)