खाद्यपदार्थ विक्रेते अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:35+5:302021-03-04T04:26:35+5:30

नाशिक : शहरातील विविध भागात सुरू झालेल्या अमृततुल्यच्या दुकानांमुळे चहाप्रेमींची वेगवेगळ्या चवींच्या चहाचा अस्वाद मिळू लागला आहे. शहरातील विविध ...

Food vendors in trouble | खाद्यपदार्थ विक्रेते अडचणीत

खाद्यपदार्थ विक्रेते अडचणीत

नाशिक : शहरातील विविध भागात सुरू झालेल्या अमृततुल्यच्या दुकानांमुळे चहाप्रेमींची वेगवेगळ्या चवींच्या चहाचा अस्वाद मिळू लागला आहे. शहरातील विविध भागांमध्ये चौकाचाैकात अशी चहाची दुकाने दिसून येत आहेत. चहाप्रेमींकडून काही दुकानांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या व्यसवायात स्पर्धाही वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या व्यावसायिकांकडून वापरल्या जात आहेत.

चेंबरवरील झाकणे बनली धोकेदायक

नाशिक : शहरातील विविध मार्गांवर असलेल्या भूमिगत गटारींच्या चेंबरवरील झाकणे खोल गेली असल्याने त्याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषत दुचाकीस्वारांना याचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा दुचाकी या खड्ड्यांमध्ये आदळते. यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच, पण दुचाकीस्वारांनाही पाठीचे विकार जडल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. रात्रीच्या वेळी याचा अधिक त्रास जाणवतो.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. काही भागातील विहिरींना आताच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते. मळ्यांमध्ये वस्तीकरून राहणाऱ्यांची अधिक गैरसोय होत आहे. यामुळे पुढील चार महिने कसे जाणार, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

परप्रांतीय मजुरांची कामासाठी भटकंती

नाशिक :ूलॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले परप्रांतीय तरुण परत आले आहेत. काहींना जुनी कामे पुन्हा मिळाली असली तरी अनेकांना कामांसाठी भटकंती करावी लागत आहे. नवीन ठिकाणी लगेच जम बसत नसल्याने या मजुरांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींनी तर नाशिक सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतर केले आहे.

--------

तपोवन परिसरात फिरणाऱ्यांची संख्या वाढली

नाशिक : तपोवन परिसरात असलेली हिरवाई आणि मोकळा रस्ता असल्याने या परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी या परिसरात नागरिक फिरताना दिसतात. दरम्यान, या रस्त्यावरही अवजड वाहनांची वाहतूक वाढू लागली आहे. यामुळे अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवजड वाहनांसाठी वेळ निश्चित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

--------

राेड टॅक्स भरण्यासाठी धावपळ

नाशिक : कोरोनाकाळात माफ झालेल्या रोड टॅक्सची सवलत मिळविण्यासाठी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारचालकांची चालू टॅक्स भरण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्या मार्च महिना सुरू असून, या महिनाअखेरपर्यंत टॅक्स पूर्ण भरला तरच सूट मिळणार असल्याची चर्चा वाहनचालक-मालकांमध्ये आहे. यामुळे अनेक जण टॅक्स भरण्यासाठी पैशांची जमवाजमव करत असल्याचे दिसून येत आहे.

ऑनलाइन कंपन्यांकडे बुकिंगचा ओघ कमी

नाशिक : ऑनलाइन बुकिंगवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडे बुकिंगचा ओघ कमी झाल्याने अनेक खासगी प्रवासी वाहतूक करणारे कारचालक अडचणीत आले आहेत. दिवसभरात चार-पाच बुकिंगही मिळत नसल्याची वाहनचालकांची तक्रार आहे. यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांना मिळेल त्या दरात प्रवासी घेऊन बाहेरगावी जावे लागत आहे.

Web Title: Food vendors in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.