खाद्यतेल भडकले, बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:19 IST2020-01-06T18:18:39+5:302020-01-06T18:19:12+5:30
महागाईचा वाढता आलेख : नववर्षातही दरवाढ कायम

खाद्यतेल भडकले, बजेट कोलमडले
चांदोरी : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील दोन महिन्यांपासून कमालीची तेजी आहे. बाजारात पाम तेलाच्या १५ लिटर मागे ४०० रु पयांची वाढ झाली असून गहू,ज्वारी ,बाजरी,मिरचीसोबतच आता तेलही महागल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे .सरत्या वर्षातील दरवाढीचा चढता आलेख नव्यावर्षातही तसाच स्थिर आहे.
मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये खाद्यतेलाचे दर स्थिर होते. दसरा दिवाळी सणामुळे मागणीही चांगली होती. दिवाळी नंतर मात्र तेलाच्या दराचा आलेख चढता राहिला .नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात तेजी होती. ती पुन्हा उसळी घेत राहिली. परिणामी सूर्यफूल व सोयाबीन तेलाच्या १५ लिटरच्या डब्यामागे अनुक्र मे २२५ व ३२५ रु पये वधारले आहेत. तर पामतेलाच्या १५ किलो डब्यामागे ४०० रु पयांची वाढ झाली. दोन महिन्यात खाद्यतेलाचे दर भडकल्याने सामान्य ग्राहकांच्या बजेटवर परिणाम झाला आहे. आयात शुल्कात झालेली वाढ आणि भारतीय खाद्यतेलांनाही मागणी वाढल्याने हि दरवाढ झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.