शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यात्रोत्सवात बचत गटाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ विक्री व प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:53 IST

सिन्नर : गावदेवी मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव भरविण्यात आला आहे. सदर उत्सवाचे औचित्य साधून सिन्नर नगरपरिषदेद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहरातील गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या माध्यमातून बचत गटाची बांधणी करण्याचे काम शहर अभियान व्यवस्थापन कक्षाद्वारे शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आजपर्यंत शहरात १०२ बचत गट बांधणी करण्यात आली आहे. १० ते २० बचत गट एकत्र करून

सिन्नर : गावदेवी मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव भरविण्यात आला आहे. सदर उत्सवाचे औचित्य साधून सिन्नर नगरपरिषदेद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.देवीमंदिर रस्त्यावर सखी साहेली, कार्तिक, शीतळा देवी, जय माता दी महिला स्वयंसहाय्यता गटांचे एकूण ४ व अभियानाची माहिती व प्रसिद्धी बाबत १ स्टॉलचे उदघाटन मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाता भगत, नगरसेवक वासंती देशमुख, सुजाता तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले.बचत गटांनी उभारलेल्या उद्योग व्यवसायास चालना मिळावी यासाठी सदर स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत घरगुती पध्दतीने बनविलेले रुचकर व चविष्ट पदार्थ सेवनाची संधी सिन्नरकरांना याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले.बचत गटांनी बनविलेल्या प्रत्येक वस्तू, पदार्थ विक्र ी करिता लवकरच एक शहर उपजीविका केंद्र उभारले जाणार असून या उपजीविका केंद्राच्या माध्यमातून विविध नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.यावेळी शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जून भोळे, अनुराधा लोंढे, सोनाली लोणारे, तसेच सखी साहेली, कार्तिक, शीतळा देवी, जय माता दी महिला स्वयंसहाय्यता गटांचे अध्यक्ष, सचिव ,सदस्य,  उपस्थित होते.