यात्रोत्सवात बचत गटाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ विक्री व प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:53 IST2018-10-11T15:52:42+5:302018-10-11T15:53:59+5:30
सिन्नर : गावदेवी मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव भरविण्यात आला आहे. सदर उत्सवाचे औचित्य साधून सिन्नर नगरपरिषदेद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रोत्सवात बचत गटाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ विक्री व प्रदर्शन
सिन्नर : गावदेवी मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव भरविण्यात आला आहे. सदर उत्सवाचे औचित्य साधून सिन्नर नगरपरिषदेद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवीमंदिर रस्त्यावर सखी साहेली, कार्तिक, शीतळा देवी, जय माता दी महिला स्वयंसहाय्यता गटांचे एकूण ४ व अभियानाची माहिती व प्रसिद्धी बाबत १ स्टॉलचे उदघाटन मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाता भगत, नगरसेवक वासंती देशमुख, सुजाता तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले.
बचत गटांनी उभारलेल्या उद्योग व्यवसायास चालना मिळावी यासाठी सदर स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत घरगुती पध्दतीने बनविलेले रुचकर व चविष्ट पदार्थ सेवनाची संधी सिन्नरकरांना याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले.
बचत गटांनी बनविलेल्या प्रत्येक वस्तू, पदार्थ विक्र ी करिता लवकरच एक शहर उपजीविका केंद्र उभारले जाणार असून या उपजीविका केंद्राच्या माध्यमातून विविध नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यावेळी शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जून भोळे, अनुराधा लोंढे, सोनाली लोणारे, तसेच सखी साहेली, कार्तिक, शीतळा देवी, जय माता दी महिला स्वयंसहाय्यता गटांचे अध्यक्ष, सचिव ,सदस्य, उपस्थित होते.