गोरगरिबांसाठी धान्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:28 IST2020-04-17T20:28:00+5:302020-04-18T00:28:32+5:30
सिन्नर : लॉकडाउनमुळे तालुक्यातीलअडचणीत आलेल्या गोरगरिबांना व हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांना १५ ते २० दिवसांच्या किराणा वाटपाचे काम ‘युवा मित्र’कडून अखंडरीत्या सुरू आहे.

गोरगरिबांसाठी धान्याची मदत
सिन्नर : लॉकडाउनमुळे तालुक्यातीलअडचणीत आलेल्या गोरगरिबांना व हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांना १५ ते २० दिवसांच्या किराणा वाटपाचे काम ‘युवा मित्र’कडून अखंडरीत्या सुरू आहे. यासाठी अनेकजण स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन मदत करीत असून, यात आता आशापूर व भाटवाडी येथील गावकऱ्यांची भर पडली आहे.
आशापूर येथील गावकºयांनी पुढाकार घेत गावातून ९ क्विंटल गहू व ५० किलो तांदूळ तर भाटवाडी ग्रामस्थांकडून ६ क्विंंटल गहू संस्थेचे संस्थापक व कार्यकारी संचालक सुनील पोटे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. पहिला लॉकडाउन संपण्याच्या आधीच सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढविल्यामुळे अनेक हातावर पोट असणाºया अनेक मजुरांना पुन्हा आपण कामावर रुजू होणार व रोजाचा पैसा घरात येऊन दोन वेळच्या जेवणाची सोय होणाºया अपेक्षेचा हिरमोड झाला, मात्र अशा गोरगरिबांना किराणा मालाचे वाटप करण्याचे काम ‘युवा मित्र’ कडून नियमित सुरू आहे. याचसाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करीत असून, यावेळी आशापूर व भाटवाडी येथील तरुणांनी व गावकºयांनी पुढाकार घेऊन ‘युवा मित्र’च्या या समाजकार्यात आपली मदत दिली आहे. यासाठी संस्थेतर्फे ‘जलसमृद्धी’ उपक्रमांतर्गत आशापूर गावात स्थापन झालेल्या ‘जय हनुमान पाणी वापर संस्थेने व सरपंचांनी लोकांना ‘युवामित्र’च्या या कार्यात मदत करण्याचे आवाहन केले होते.