लोकसंगीत प्रशिक्षण कार्यशाळा
By Admin | Updated: May 15, 2014 00:02 IST2014-05-15T00:01:17+5:302014-05-15T00:02:30+5:30
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान व लोकरंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २३ मे दरम्यान नाट्याभिनय व लोकसंगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये पथनाट्य, नाटक, संगीत, शाहिरी, लोककला, लोकगीत, लोकसंगीत, नाट्य कलेचा इतिहास, अभिनय, संवादफे क, आवाज, मायमिंग या विषयांवर शाहीर तथा जलसाकार तसेच शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या प्रसिद्ध नाटकाचे संकल्पनाकार लोकशाहीर संभाजी भगत हे प्रशिक्षण देणार आहेत़ याबरोबरच आघाडीची अभिनेत्री व प्रशिक्षिका अश्विनी दिघे, बालरंगभूमीचे संस्थापक प्रवीण गांगुर्डे मार्गदर्शन करणार आहेत़ इच्छुकांनी नावनोंदणीसाठी कुसुमाग्रज स्मारक येथे संगीता गायकवाड व सुशांत गरुड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन ॲड़ बाबासाहेब नन्नावरे व प्रवीण गांग्

लोकसंगीत प्रशिक्षण कार्यशाळा
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान व लोकरंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २३ मे दरम्यान नाट्याभिनय व लोकसंगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये पथनाट्य, नाटक, संगीत, शाहिरी, लोककला, लोकगीत, लोकसंगीत, नाट्य कलेचा इतिहास, अभिनय, संवादफे क, आवाज, मायमिंग या विषयांवर शाहीर तथा जलसाकार तसेच शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या प्रसिद्ध नाटकाचे संकल्पनाकार लोकशाहीर संभाजी भगत हे प्रशिक्षण देणार आहेत़ याबरोबरच आघाडीची अभिनेत्री व प्रशिक्षिका अश्विनी दिघे, बालरंगभूमीचे संस्थापक प्रवीण गांगुर्डे मार्गदर्शन करणार आहेत़ इच्छुकांनी नावनोंदणीसाठी कुसुमाग्रज स्मारक येथे संगीता गायकवाड व सुशांत गरुड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन ॲड़ बाबासाहेब नन्नावरे व प्रवीण गांगुर्डे यांनी केले आहे़(प्रतिनिधी)