चिंचमळा शाळेत फुलली परसबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:46 IST2019-12-29T22:45:20+5:302019-12-29T22:46:13+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचमळा येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी परसबाग फुलविली आहे. शिक्षक प्रियांका ससे यांच्या विचारप्रेरणेतून आणि मुख्याध्यापक सुनील माने यांच्या सहकार्याने प्रथम वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे लावण्यात आली. यानंतर लसूण लागवड केली.

चिंचमळा जिल्हा परिषद शाळेत परसबागेचे काम करताना प्रियंका ससे, सुनील माने. समवेत विद्यार्थी.
येवला : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचमळा येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी परसबाग फुलविली आहे.
शिक्षक प्रियांका ससे यांच्या विचारप्रेरणेतून आणि मुख्याध्यापक सुनील माने यांच्या सहकार्याने प्रथम वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे लावण्यात आली. यानंतर लसूण लागवड केली. त्याचप्रमाणे आलं, पालक, कोथिंबीर, बटाटा, गवार,शेपू, डांगर, चक्की, भेंडी, गिलके, दोडके यांची लागवडही केली. परसबाग तयार करण्यासाठी सचिन शेळके यांचे सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मीक शेळके यांनी
वाफे बनविले. ज्येष्ठ नागरिक फकिरा शेळके यांनी बी रोपणक्रि येची माहिती दिली.