आदिवासी भागातील लसीकरणावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:05+5:302021-05-30T04:13:05+5:30

व्यावसाियकांकडून मदतीची मागणी नाशिक : जिल्ह्यात सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच परवानगी देण्यात आल्यामुळे अन्य व्यावसायावर आर्थिक परिणाम झाला ...

Focus on vaccination in tribal areas | आदिवासी भागातील लसीकरणावर लक्ष

आदिवासी भागातील लसीकरणावर लक्ष

व्यावसाियकांकडून मदतीची मागणी

नाशिक : जिल्ह्यात सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच परवानगी देण्यात आल्यामुळे अन्य व्यावसायावर आर्थिक परिणाम झाला आहे. अनेकांच्या रोजीरोटीचा देखील प्रश्न निर्माण झाल्यामुळे रिक्षा चालकांप्रमाणेच व्यावसायिकांना देखील आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी व्यावसायिक संघटनांकडून केली जात आहे.

उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडस‌्

नाशिक : ग्रामीण भागातील रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता जिल्ह्यातील काही उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडस‌् उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना बेडस‌् मिळविण्यासाठी नाशिक शहरात धाव घ्यावी लागली होती. आता त्यांची धावपळ कमी होणार आहे.

केशरी कार्डधारकांनाही मिळणार धान्य

नाशिक : अन्नसुरक्षा योजनेंतर्गत केशरी रेशन कार्डधारकांना जून महिन्यात देखील मोफत धान्य दिले जाणार असल्याने जिल्ह्यातील हजारो कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे. मे महिन्यातील नियमित आणि मोफत धान्याचा लाभ कार्डधारकांना झालेला असून आता जूनमध्ये देखील मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यात मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. हातगाडीवरील व्यवसायांमध्ये झाली वाढ

नाशिक : राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे या विक्रेत्यांनी आपला माल हातगाडीवर ठेवून विक्री सुरू करण्याची शक्कल लढविली आहे. स्नॅक्स, कटलरी, अंडी, बेकरी प्रॉडक्ट्स, पूजा साहित्य अशी अनेक दुकाने हातगाडीवर थाटून व्यवसाय केला जात आहे.

शिधापत्रिका नसलेल्यांनाही धान्य देण्याची मागणी

नाशिक : कोरोनामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मोफत धान्यपुरवठा केला जात आहे. त्याचा लाभ रेशन कार्डधारकांना होत असला तरी ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा नागरिकांना देखील धान्य देण्यात यावे किंवा कार्ड मिळविण्यासाठी ज्यांची प्रक्रिया सुरू आहे त्यांना या योजनेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी काही सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रकार

नाशिक : पतंगबाजी करताना झाडावर अडकलेल्या मांजात पक्षी अडकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मागील दोन आठवड्यात झालेल्या जोरदार वादळामुळे झाडावरील मांजा पुन्हा दिसू लागला असून त्यामध्ये पक्षी अडकण्याचे प्रकार घडले आहे. सिडको, नाशिक रोड तसेच पंचवटीत असे अनेक प्रकार समोर आले आहेत. जागरूक नागरिक आणि पक्षी मित्रांनी झाडावर अकडलेल्या पक्ष्यांना जीवदान दिले आहे.

Web Title: Focus on vaccination in tribal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.