आता हौशी वैमानिकांसाठी फ्लार्इंग क्लब

By Admin | Updated: April 17, 2017 00:55 IST2017-04-17T00:54:36+5:302017-04-17T00:55:47+5:30

छंद जोपासण्याचा प्रयत्न : चालविण्याचे प्रशिक्षण, आज एचएएलमध्ये प्राथमिक चर्चा

Flying clubs for amateur pilots now | आता हौशी वैमानिकांसाठी फ्लार्इंग क्लब

आता हौशी वैमानिकांसाठी फ्लार्इंग क्लब

नाशिक : विमानसेवा म्हणजे केवळ प्रवासी वाहतूक असे नव्हे तर ग्लायाडंगसारखा एक खेळ म्हणून ते चालविण्याची हौसही असू शकते. किंबहूना विमानाशी संबंधित खूप गोष्टी शिकण्यासारख्या आणि करिअर म्हणून निवडता येण्यासारख्या आहेत. नाशिकमध्ये अशाप्रकारचा फोरम तयार व्हावा यासाठी बॉम्बे फ्लार्इंग क्लबचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी (दि.१७) एचएएल येथे क्लबचे सदस्य प्राथमिक चर्चा करणार आहेत. तसेच प्रात्यक्षिकेही सादर करणार आहेत.
बॉम्बे फ्लार्इंग क्लब हा अत्यंत जुना असून, १९२८च्या सुमाराला स्थापन झालेल्या या क्लबचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या फिरोज मसानी यांनी नाशिकमध्ये फोरम तयार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिकमध्ये देवळाली ग्लायडिंग क्लब आहे. मात्र, सध्या हा क्लब अडचणीत आहे. त्यातच नाशिकमध्ये विमानसेवेबाबत जी जागरूकता किंवा जिज्ञासा वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात काही तरी करावे या मताचे मसानी आहेत. त्यामुळेच त्यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Flying clubs for amateur pilots now