शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पुष्पोत्सव : ‘गुलशनाबाद’मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना मोहिनी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 21:48 IST

देश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे.

ठळक मुद्देप्रदर्शनात गुलाबाच्या पन्नासपेक्षा अधिक प्रजाती येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार

नाशिक : गुलशनाबाद अर्थात फुलांचे शहर अशी नाशिकची जुनी ओळख. अल्हाददायक पोषक वातावरण लाभलेल्या या शहरात विविध भारतीय प्रजातीची फुले फुलतात; मात्र विदेशी प्रजातीच्या फुलांनाही येथील हवामान चांगलेच मानवते, याचा प्रत्यय नासिक्लबच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवात आला. हजारो फुलांच्या ताटवे न्याहाळताना नाशिककर या अद्भूत दुनियेत रमले.पुणे महामार्गावर नंदीनीच्या काठालगत वसलेल्या ‘नासिक्लब’च्या हिरवळीवर बुधवारी (दि.२४) संध्याकाळी ‘फ्लॉवर्स-शो २०१८’ या प्रदर्शनाचे उद्घाटन गणेश पूजनाने करण्यात आले. यावेळी ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा, नासिक्लबचे संचालक रामेश्वर सारडा, विक्रम सारडा, ज्येष्ठ वास्तुविशारद अरुण काबरे, पुष्परचनाकार हिमानी जेठवा, अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा आदि मान्यवर उपस्थित होते.

देश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना ‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे.

यंदाचे या प्रदर्शनाचे दुसरे वर्ष असून प्रदर्शनात गुलाबाच्या पन्नासपेक्षा अधिक प्रजाती आहे. पांढरी, स्प्रे, पर्पल पॉम, पिवळ्या रंगाच्या शेवंतीसह २२ प्रकार येथे बघायला मिळतात. गुलाबाचे विविध प्रकार मनाला मोहिनी घालतात.

पिवळ्या झेंडूसह ‘क्रिस्पा’ हा वेगळा प्रकारही झेंडूचा या पुष्पोत्सवात बघता येऊ शकतो. गुरूवारी (दि.२५) या पुष्पोत्सवात शहरातील आठ शाळांचे विद्यार्थी हजेरी लावणार असून हा दिवस शाळकरी मुलांसाठी राखीव असल्याचे संयोजकांनी सांगितले.

विदेशी फुलांचा खजिनाएकूणच पुष्पप्रेमींना विविधरंगी फुलांच्या वेगवेगळ्या प्रजाती या प्रदर्शनात न्याहाळण्यास मिळणार आहे. भारतीय प्रजातीसह विदेशी प्रजातीची ब्राझीलियन बटरफ्लाय, प्रीन्स फुल, ऐडिनियम, त्याचप्रमाणे कॅलेठ्यूला, तोरेनिया, बालसम, साल्विया, इंप्रेशन्स, असिलम, लिलियम, ट्यूलिप, ग्लॅडियस, बेगोनिया, आफ्रिकन गुलाब, जिरेनियम, डायनथस, ओरनामेंटल केल, पेन्सी, पेटूनिया, डेलिया असे असंख्य प्रकारच्या फुलांचा खजिना येथे रिता झाला आहे.

फुले पाहण्याचा अवर्णनीय आनंद नाशिककरांना मिळावा तसेच भावी पिढी फुलांच्या माध्यमातून निसर्गाच्या जवळ जावी, जेणेकरुन आगामी काळात पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागण्यास मदत होईल, या उद्देशाने सलग दुस-यांना पुष्प प्रदर्शन भरविले आहे.भारतीय पुष्पांसह विदेशी पुष्पांच्या विविध प्रजाती येथे मांडण्यात आल्या आहेत. तसेच पुष्परचनाही आगळ्या वेगळ्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.- रामेश्वर सारडा, उद्योजक

टॅग्स :NashikनाशिकNatureनिसर्ग