शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

गोई नदीला १४ वर्षानंतर महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:39 PM

मुखेड / मानोरी / देशमाने : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, सत्यगाव आदी परिसरात शनिवारी, ( दि.१९ ) संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री १० वाजता झालेल्या ढगफुटी सदृश पाऊस बरसला. या पावसाने येथील गोई नदीला तब्बल १४ वर्षानंतर महापूर आला असून रविवारी, ( दि. २० ) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान गोई नदी दुथडी भरून वाहतांना धोक्याची पातळी देखील ओलांडली होती. परिसरात शेतात साचलेल्या पाण्यामुळे दुपार पर्यंत रस्त्याच्या कडेला असलेल्या नद्या, नाल्या तुडुंब भरून प्रवाहित होत्या.

ठळक मुद्देशेतपिकांचे नुकसान:शेतातसाचलेपाणी,नालेतुडूंब

मुखेड / मानोरी / देशमाने : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, सत्यगाव आदी परिसरात शनिवारी, ( दि.१९ ) संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री १० वाजता झालेल्या ढगफुटी सदृश पाऊस बरसला. या पावसाने येथील गोई नदीला तब्बल १४ वर्षानंतर महापूर आला असून रविवारी, ( दि. २० ) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान गोई नदी दुथडी भरून वाहतांना धोक्याची पातळी देखील ओलांडली होती. परिसरात शेतात साचलेल्या पाण्यामुळे दुपार पर्यंत रस्त्याच्या कडेला असलेल्या नद्या, नाल्या तुडुंब भरून प्रवाहित होत्या.याआधीच झालेल्या पावसामध्ये अनेक पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झालेली असताना शनिवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कांद्याचे तसेच लागवडीसाठी आलेल्या कांद्याच्या रोपांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदीच्या कडेला असलेल्या मका, सोयाबीन, कांद्याचे शेतात नदीचे पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान होण्याची भीती शेतक?र्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. तसेच मानोरी येथे उभा असलेला ऊस देखील वा?र्यामुळे भुईसपाट झाला आहे. देशमाने येथील नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गावर असलेल्या दोन्ही पुलावरून पाणी वाहत होते. पाण्याचा जोर कमी झाल्याने खबरदारी म्हणून एक पूल राहदरीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला होता. एकेरी पुलावरून दोन्ही बाजूंच्या वाहनांची वाहतूक काही वेळाने सुरू केली होती.तसेच येथील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिर , खंडेराव महाराज मंदिर, श्री स्वामी समर्थ या मंदिराला देखील या महापुराचे पाणी लागले होते.---------------------मानोरी येथील पूल देखील पुराच्या पाण्याखाली गेल्याने मानोरी बुद्रुक ते मानोरी फाटा हा रस्ता देखील वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केल्यानंतर 3 गावांचा देखील संपर्क तुटला होता. देशमाने येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात पाणी शिरल्याने मानोरी देशमाने रस्ता देखील काही काळ बंद करण्यात आला होता. 14 वर्षानंतर गोई नदीला महापूर आल्यानंतर मानोरी, देशमाने, मुखेड, खडकीमाळ आदी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महापुराचे फोटो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पाणी बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. पाणी बघण्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. प्रत्येक नागरिकाने सेल्फीसह फोटो काढण्याचा मनमुराद आनंद यावेळी लुटला.1) : मानोरी येथील नदीच्या कडेला असलेल्या कांदा लागवड झालेल्या शेतात साचलेले महापुराचे पाणी.2) : देशमाने येथील गोई नदीला महापूर आल्यानंतर वाहन असलेले पाणी.3) : ढगफुटी सदृश पावसामुळे मुखेड येथील महापुराचे पाणी गोई नदीला पाणी आल्यानंतर टिपलेले विहंगम दृष्य.4) : मानोरी येथे ढगफुटी सदृश पाऊस आणि वा?र्यांमुळे उभा असलेल्या ऊस भुईसपाट झाला.5) फोटो : मानोरी येथे मका पिकात साचलेले पाणी(२०येवला१ते५) 

 

टॅग्स :Rainपाऊसwater transportजलवाहतूक