शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:40 IST

आपण महायुतीसोबतच, गावकऱ्यांनी आग्रह केला म्हणून व्यासपीठावर बसलो, बोललो काहीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क दिंडोरी (जि. नाशिक) : दिंडोरी मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्षांचे आमदार प्रचारात सक्रिय होत नसल्याची तक्रार होत असतानाच दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारसभेला विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरीचे अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी हजेरी लावली. त्यामुळे झिरवाळ यांच्या घरवापसीच्या चर्चेला उधाण आले आहे; तर, झिरवाळ यांनी आपण एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त तेथे गेलो होतो, असे सांगत आपण महायुतीतच असल्याचे स्पष्ट केले आहे. 

प्रचारसभेतील फोटोच व्हायरल झाल्याने चर्चांना उधाणn दिंडोरीत भाजपच्या विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होत आहे. n झिरवाळ यांनी भास्कर भगरे यांच्या प्रचारसभेला हजेरी लावल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली. भाजपकडूनही याची गंभीर दखल घेण्यात आल्याचे समजते.  

आपण मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाला आधीपासूनच हजर होतो. त्यात तेथे भगरे यांची प्रचारसभा सुरू असल्याने गावकऱ्यांनी व्यासपीठावर बसण्याचा आग्रह धरला. तेथे आपण कोणतेही भाषण केले नाही. आपण महायुतीतच असून, गुरुवारी मी भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारात रात्री उशिरापर्यंत कार्यरत होतो.  - नरहरी झिरवाळ

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४