धावत्या प्रवासी रेल्वे गाडीमध्ये माथेफिरून फेकले ज्वलनशील पदार्थ; दोन प्रवाशी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 18:30 IST2022-11-23T18:29:13+5:302022-11-23T18:30:04+5:30

रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक तपास करीत आहे.

flammable material thrown upside down in a running passenger train two passengers injured | धावत्या प्रवासी रेल्वे गाडीमध्ये माथेफिरून फेकले ज्वलनशील पदार्थ; दोन प्रवाशी जखमी

धावत्या प्रवासी रेल्वे गाडीमध्ये माथेफिरून फेकले ज्वलनशील पदार्थ; दोन प्रवाशी जखमी

अशोक बिदरी, लोकमत न्यूज नेटवर्क

मनमाड (नाशिक) : लोकमान्य टिळक टर्मिनस - जय नगर पवन एक्स्प्रेसमध्ये एका माथेफिरूने सहप्रवाश्यांवर ज्वलनशील पदार्थ फेकल्याने दोन प्रवाशी जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार लासलगाव - मनमाड रेल्वे स्थानाकादरम्यान घडला.

गाडी मनमाड  स्थानकात येताच माथेफिरूला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या  रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचऱयांवर त्याने ज्वलनशील पदार्थ फेकल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह मदतीसाठी गेलेल्या खाद्यपदार्थ विक्रेतेही जखमी झाले या गदारोळात गाडी सुमारे २० मिनिटे मनमाड स्थानकात उभी होती.रेल्वे सुरक्षा बलाने  माथेफिरूला ताब्यात घेतले असून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक तपास करीत आहे.
 

Web Title: flammable material thrown upside down in a running passenger train two passengers injured

टॅग्स :Nashikनाशिक