बोराळे ग्रामपंचायतीवर प्रगती पॅनलचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 18:19 IST2019-12-09T18:18:49+5:302019-12-09T18:19:03+5:30
थेट सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी पवार

बोराळे ग्रामपंचायतीवर प्रगती पॅनलचा झेंडा
साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी उपसरपंच राजेंद्र पवार यांच्या प्रगती पॅनलने बाजी मारली असून, थेट सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी पवार विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाबरोबरच सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी ८८.५७ टक्के मतदान झाले होते.
एकूण १५१४ मतदारांपैकी १३४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्र मांक १ मधील एकूण ५३४ पैकी ४८७ मतदारांनी, तर प्रभाग क्रमांक २ मधील एकूण ४११ पैकी ३८०, तर प्रभाग क्रमांक ३ मधील एकूण ५६९ पैकी ४७४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. थेट सरपंचपदासाठी अश्विनी पवार व सुनीता सोळुंके यांच्यात, तर निवडणुकीत प्रगती पॅनल व गिरणेश्वर पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव असलेल्या थेट सरपंचपदाच्या जागेसाठी माजी उपसरपंच राजेंद्र पवार यांच्या पत्नी अश्विनी पवार, तर माजी सरपंच सुभाष सोळुंके यांच्या सून सुनीता सोळुंके यांच्यात सरळ लढत होती. त्यात अश्विनी पवार यांना ७५७, तर सुनीता सोळुंके याना ५८२ मते मिळाल्याने पवार यांनी १७५ मताधिक्य मिळवत विजय मिळवला.
प्रभाग क्र मांक १ मधून उज्ज्वल सोळुंके (२५९), मोनाली सोळुंके (२५९ ), अश्विनी देवरे (२६९) विजयी झाले, तर प्रभाग क्र मांक २ मधून अनिल पाटील (२०१), भारती मोरे (२०८), ललिता सोळुंके (२१३) विजयी झाले. प्रभाग क्र मांक ३ मधून अनिल जाधव (२९२), रामभाऊ मोरे (३०४ )आणि सुनंदा मोरे (२३९) विजयी झाले.