‘नुरी मिशन’च्या वतीने ध्वजारोहण
By Admin | Updated: August 17, 2015 23:41 IST2015-08-17T23:40:54+5:302015-08-17T23:41:28+5:30
‘नुरी मिशन’च्या वतीने ध्वजारोहण

‘नुरी मिशन’च्या वतीने ध्वजारोहण
नाशिक : ‘नुरी मिशन’ पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वातंत्र्यदिन पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धर्मगुरू हजरत मौलाना मुफ्ती रिजवान सय्यद यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. या मिशनच्या कार्यकर्त्यांकडून वडाळारोडवरील काझीनगरमध्ये मिठाई वाटण्यात आली.
दरम्यान, ‘नुरी मिशन’ची कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव उपस्थित होते. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी समाजाला दिलेली देशभक्तीच्या शिकवणीवर प्रकाश टाकताना, सय्यद म्हणाले, ‘वतन की मुहब्बत, इमान की अलामत हैं’ असा संदेश पैगंबरांनी दिला आहे. त्यामुळे आपण आपल्या देशावर निष्ठा, भक्ती ठेवणे हे इमानचे एक लक्षण आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. नुरी मिशनकडून अशाच पध्दतीने समाजप्रबोधन केले जात आहे. यावेळी आयशा मशिदीची इमाम मौलाना जाहीद अशरफी, डॉ. इमरान खान, अहमद रजा, तन्जीम अन्सारी यांच्यासह परीसरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.