विनयभंग प्रकरणात पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By Admin | Updated: June 9, 2017 20:21 IST2017-06-09T20:21:38+5:302017-06-09T20:21:38+5:30
दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

विनयभंग प्रकरणात पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
नाशिक : दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कैलास चंदू रायघोळ (४५, रा़आम्रपालीनगर, कॅनॉलरोड, नाशिकरोड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी शुक्रवारी (दि़९) पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ २९ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती़
आम्रपालीनगरमध्ये राहणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीसोबत कैलास रायघोळ याने अतिप्रसंग केला होता़ या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांच्या न्यायलयात सुरू होता़ सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी नऊ साक्षीदार तपासले़ यामध्ये मुलीची, डॉक्टरांची व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली़ तर महिला पोलीस उपनिरीक्षक पी़बीक़ेदार यांनी या गुन्ह्याचा तपास केला़
न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यानुसार आरोपी कैलास रायघोळ यास बलात्काराच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास तर पोस्को कायद्यान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़ या शिक्षा कंक्टीट भोगावयाच्या असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे़