पाच सोसायट्या अवसायनाच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: June 1, 2017 01:13 IST2017-06-01T01:13:48+5:302017-06-01T01:13:57+5:30
येवला : सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वेळोवेळी संधी देऊनही या बँकेचे कर्ज देणे रक्कम ही सभासद येणे कर्जापेक्षाही अधिक आहे

पाच सोसायट्या अवसायनाच्या उंबरठ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील पाच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना गेल्या पाच वर्षांत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वेळोवेळी संधी देऊनही या संस्थांमधील बँकेचे कर्ज देणे रक्कम ही सभासद येणे कर्जापेक्षाही अधिक आहे. अर्थात अनिष्ठ तफावत भरून न निघालेल्या या संस्था अवसायनात काढण्याची कारवाई शनिवार, दि. ३ जूननंतरच्या अंतिम औपचारिक सुनावणीनंतर होणार असल्याची माहिती सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली.
तालुक्यातील देवठाण, खामगाव, ठाणगाव, नगरसूल लाड व शिरसगाव लौकी या पाच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी त्यांच्या ताळेबंदास ३१ मार्च २०१३ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देणे कर्ज रक्कम जास्त व सभासद येणे कर्ज रक्कम कमी असल्याने ही अनिष्ठ तफावत होती. परंतु गेल्या चार वर्षांत या संस्था आर्थिक सक्षम झाल्या नाही. शिवाय या संस्थांनी समान उद्देश असलेल्या जवळच्या सक्षम संस्थेत विलीनही झाल्या नाहीत. त्यामुळे या संस्थांवर अवसायनाच्या कारवाईला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवली आहे.