कोलटेक फाटा येथील पाच दुकाने भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:28 IST2020-07-13T20:15:26+5:302020-07-14T02:28:56+5:30
चांदवड/काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील कोलटेक फाटा येथील पत्र्याच्या दुकानांना रविवारी (दि.१२) रात्री दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळुन खाक झाली. या आगीत सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.

कोलटेक फाटा येथील पाच दुकाने भस्मसात
चांदवड/काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील कोलटेक फाटा येथील पत्र्याच्या दुकानांना रविवारी (दि.१२) रात्री दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळुन खाक झाली. या आगीत सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.
कोलटेक फाटा येथील विंचूर -प्रकाशा रोड लगत जमादास खांगळ यांच्या मालकीच्या गट नंबर २५३ मध्ये पत्राचे पाच गाळयांचे कॉम्प्लेक्स मध्ये अनिल ठोके यांचे हॉटेल गुरु कृपा व दोन गाळ्यांमध्ये रविंद्र खांगळ यांचे ओम कृषी सेवा तसेच पवन ठोके यांचे रामेश्वर किराणा व सोमनाथ आरगडे यांचे गुरु कृपा हार्डवेअर ही दुकाने आहेत.
अग्निशामक दल पोहोचण्यापूर्वीच दुकानातील माल आगीच्या भक्ष्यस्थानी रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास पाच पैकी एका दुकानात शॉर्टसर्किट झाल्याने दुकानास आग लागली. आगीची तीव्रता जास्त असल्याने गाळ्यांमधील पार्टीशन साठी असलेले पत्रे जळाल्याने पाचही दुकानांना आगीने घेरले. आग लागण्याचे शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मनमाड अग्निशामक दलाला व पोलीस स्टेशनला खबर दिली. अग्नीशामक दल घटनास्थळा पर्यत पोचेपर्यत पाच ही दुकानातील संपूर्ण माल जळुन खाक झाला. यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले़
----------------------
नव्यानेच व्यवसायात प्रवेश अऩ़़्
सदर घटनेचा तलाठी शिवाजी नवले व कोतवाल पंकज ठाकरे, ग्रामसेवक श्रीमती ए. एस. भालेराव, पोलीस हवालदार दीपक मोरे , थोरात यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यात अंदाजे हॉटेल गुरु कृपा यांचे चार लाखाचे, ओमकृषी सेवा केंद्र यांचे १६ लाखाचे व रामेश्वर किराणा यांचे पाच लाखाचे, गुरु कृपा हार्डवेअर यांचे सात लाखाचे असे एकुण ३२ लाखाचे नुकसान झाले आहे. नव्यानेच व्यवसायात उतरलेल्या व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.