पाच चंदनचोरट्यांना पिस्तुलासह अटक

By Admin | Updated: June 17, 2017 00:36 IST2017-06-17T00:35:45+5:302017-06-17T00:36:17+5:30

इंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़१६) पाथर्डीगाव चौफुलीवर संशयास्पद इंडिकाचा पाठलाग करून चंदन चोरट्यांच्या टोळीच्या जेरबंद केले

Five sandalis were arrested with pistols | पाच चंदनचोरट्यांना पिस्तुलासह अटक

पाच चंदनचोरट्यांना पिस्तुलासह अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़१६) पहाटे पाथर्डीगाव चौफुलीवर संशयास्पद इंडिकाचा पाठलाग करून पाच चंदन चोरट्यांच्या टोळीच्या जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीचे ५० हजार रुपयांचे चंदनाचे लाकूड, पिस्तूल व हत्यारे जप्त केले आहेत़ या पाचही संशयितांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अजय पगारे, सचिन सोनवणे हे पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास वडनेर गेट ते पाथर्डीगाव चौफुली रस्त्यावर गस्त घालीत होते़ त्यावेळी वडनेर गेटकडून पांढऱ्या रंगाची इंडिका (एमएच १६, एबी १६२३) भरधाव आली़ या इंडिकास थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पाथर्डी गावाकडे पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून वाहन अडवले़
या वाहनातील संशयित सोमनाथ मधुकर कुऱ्हाडे (२८), गणेश भानुदास कुऱ्हाडे (२७), सचिन मधुकर कुऱ्हाडे (२५), अनिल अशोक कुऱ्हाडे (३०), कैलास भानुदास कुऱ्हाडे (२५) या पाच जणांना ताब्यात घेतले़
या संशयितांकडे पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे तर इंडिकामध्ये चंदनाच्या कापलेल्या झाडाचे लाकूड, झाड कापण्यासाठी करवत, कुऱ्हाडी असे आढळून आले़ या पाचही संशयितांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे़

Web Title: Five sandalis were arrested with pistols