शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

लाखोंचा ऐवज लुटला: गणेशोत्सवात पाच घरफोड्या अन् सोनसाखळ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:43 IST

नाशिक : धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र ...

ठळक मुद्देभामट्यांनी तब्बल ४लाख ५७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला शहरात पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय

नाशिक : धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र शहरात घरफोड्या, दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घटनांमध्ये भामट्यांनी तब्बल ४लाख ५७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच ३५ हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.शहर व परिसरात ऐन गणोशोत्सवात गुन्हेगारीने डोके वर काढले. सोनसाखळी चोरीच्या घटनांपासून घरफोड्यांपर्यंत गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गणेशोत्सवात चोख पोलीस बंदोबस्तामुळे हजारो पोलीस रस्त्यावर होते. तसेच वाहने साततत्याने गस्तीवर असतानाही चोरट्यांनी सोनसाखळी चोरीचे धाडस केले. डीजीपीनगर क्रमांक-१मधील मंगलमुर्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आश्विनी भोसले (३३) यांची सदनिका अनंत चर्तुदशीच्या दिवशी भरदुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केली. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिण्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख १३ हजार ५०० रूपयांचा ऐवज लूटून पोबारा केला. याप्रकरणी भोसले यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुस-या घटनेत प्रबुध्दनगर येथील एका पीठ गिरणीचे शटरचे कुलूप तोडून ते उचकटून अज्ञात चोरट्याने ३५ हजार ५०० रूपयांची रोकड, ९ हजार रूपये किंमतीच्या तीन चांदीच्या मुर्ती असा एकूण ४४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रशांत उध्दव भोसले यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.शहरात पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाली असून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असतानाही चोरटे सर्रासपणे भरदिवसा बंद घरांचे कुलूप तोडून हजारो ते लाखो रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.--गणेशोत्सव काळात असे घडले गुन्हेसातपूर, पंचवटी, आडगाव येथे खूनाचा प्रयत्नइंदिरानगरला दोन तर म्हसरूळ, सातपूर पोलीस ठाणे हद्दीत तीन सोनसाखळ्या चोरीपंचवटी, सातपूर, मुंबईनाका हद्दीत जबरी चोरीअंबड, इंदिरानगर, उपनगर, पंचवटी, सातपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीGaneshotsavगणेशोत्सव