दत्तु भोकनळला पुढील सरावासाठी पाच लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 15:53 IST2018-11-07T15:50:54+5:302018-11-07T15:53:11+5:30

चांदवड - चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदतीसाठी सहविचार सभेचे आयोजन केले .

 Five lakhs of help for Dattu Bhokanal for the next study | दत्तु भोकनळला पुढील सरावासाठी पाच लाखाची मदत

दत्तु भोकनळला पुढील सरावासाठी पाच लाखाची मदत

ठळक मुद्देबैठकीस मनोज शिंदे, प्रभाकर ठाकरे,सुनील डुंगरवाल, विशाल ललवाणी, कासलीवाल, बाळासाहेब वाघ, शांताराम ठाकरे, गटविकास अधिकारी महेश पाटीलया, बी.टी.चव्हाण, शासकीय अधिकारी , पदाधिकारी उपस्थित होते.


चांदवड - चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदतीसाठी सहविचार सभेचे आयोजन केले .अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल अहेर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल,प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक,सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, सुनील शेलार , रोर्इंग पट्टू दत्तु भोकनळ,चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील,वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके ,उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, कृउबाचे उपसभापती नितीन अहेर, रावसाहेब भालेराव, का.भा. अहेर, जगन्नाथ राऊत, सुनील कबाडे , विलास ढोमसे व विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक भोसले यांनी केले.यावेळी दत्तु भोकनळला पुढील खेळांसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदतीसाठी सर्व अधिकारी, सेवाभावी संस्था, बॅका, पतसंस्थांनी पुढे येऊन मदत करावी आगामी आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी  दत्तु भोकनळ यास मदत करावी असे आवाहन आमदार डॉ. राहुल अहेर, व शिरीषकुमार कोतवाल यांनी केले.
 

Web Title:  Five lakhs of help for Dattu Bhokanal for the next study