शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीतील भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर; गिरीश महाजन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:56 IST

Dindori Accident News: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या इंदोरे येथील दरगोडे कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत सहा विद्यार्थ्यांसह एकूण नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

- भगवान गायकवाड नाशिक - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या इंदोरे येथील दरगोडे कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत सहा विद्यार्थ्यांसह एकूण नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. शिवाजीनगर परिसरातील रस्त्यालगत असलेल्या या धोकादायक विहिरीसंदर्भात पर्यायी उपाययोजना का करण्यात आली नाही, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विहीर मालक राजेंद्र राजे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित विहीर तातडीने बुजविण्यात येणार असून जिल्ह्यात अशा धोकादायक विहिरींचा सर्वे करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, दुपारी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. इंदोरे गावात शोककळा पसरली असून अत्यंत शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : सुनील दत्तात्रेय दरगोडे (वय ३२) यांच्यासह त्यांच्या पत्नी रेशमा सुनील दरगोडे (२७), मुलगी राखी उर्फ गुणवंती (१०) आणि दोन पुतण्या माधुरी अनिल दरगोडे (१३) व श्रावणी अनिल दरगोडे (११) यांचा समावेश आहे. तसेच आशा अनिल दरगोडे (३२) यांच्यासह त्यांचा मुलगा श्रेयश अनिल दरगोडे (११), मुलगी श्रुष्टी अनिल दरगोडे (१४) आणि पुतणी समृद्धी राजेश दरगोडे (७) यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dindori Accident: ₹5 Lakh Relief for Kin of Deceased Announced

Web Summary : Nine people, including six students, died in Dindori after a car fell into a well. Minister Girish Mahajan announced ₹5 lakh compensation for families. An inquiry is ordered into the dangerous well, with plans for a survey of similar hazards.
टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात