कळवण : तालुक्यातील कळवण खुर्द व शिरसमणी येथील दोन कृषी सेवा केंद्र मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून पाच लाख रु पयांचे कांदा बियाणे व रोख रक्कम लंपास केली आहे.कळवण खुर्द येथील दत्त मंदिरा समोर असलेल्या दीपक बाबाजी शिंदे यांचे गुरु दत्त कृषी सेवा केंद्र दुकान मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पत्र्याचे स्कृ काढून दुकानातील पाच लाख रु पयांचे कांदा बियाणे व 55 हजार रु पये रोख रक्कम लंपास केली आहे. तर शिरसमनी येथील जितेंद्र वाघ यांचे यशवंत कृषी सेवा केंद्राचा पत्रा कटरच्या सहाय्याने कापून दुकानातील 30 हजार रु पये रोख रक्कम लंपास केली आहे. कळवण पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश निकम पुढील तपास करत आहेत.एकीकडे कांदा बियाण्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असताना चोरट्यांनी कांदा बियाणे चोरी कडे आपला मोर्चा वळवला असून कृषी सेवा केंद्रांना लक्ष्य केले जात आहे.
पत्रे कापून कृषी सेवा केंद्रातून पाच लाखाचे बियाणे चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:43 IST
कळवण : तालुक्यातील कळवण खुर्द व शिरसमणी येथील दोन कृषी सेवा केंद्र मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून पाच लाख रु पयांचे कांदा बियाणे व रोख रक्कम लंपास केली आहे.
पत्रे कापून कृषी सेवा केंद्रातून पाच लाखाचे बियाणे चोरी
ठळक मुद्देचोरट्यांनी कांदा बियाणे चोरी कडे आपला मोर्चा वळवला