नाशिक : पुणे महामार्गावर शनिवारी (दि.२८) एक ट्रक आणि आयशरची धडक होऊन झालेल्या अपघातात एकूण ५ प्रवाशी जागीच ठार झाले आहे.सिन्नर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एक आयशर वाहन संगमनेरच्या दिशेने जात असताना सिन्नर शिवारात असताना महामार्गावर गायींचा कळप रस्त्यावर आल्यामुळे आयशर चालकाने तातडीने ब्रेक लगावला; मात्र त्यापाठीमागून येणाऱ्या ट्रकवरील (एमएच१८ क्यू ६०४८) चालकाला वेळीच नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे ट्रक पाठीमागून आयशरवर जाऊन आदळला.
गायींचा कळप रस्त्यावर; सिन्नर शिवारात अपघातात पाच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:08 IST
ट्रक पाठीमागून येऊन आदळल्याने ट्रकमध्ये समोर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद केली जात होती.
गायींचा कळप रस्त्यावर; सिन्नर शिवारात अपघातात पाच ठार
ठळक मुद्देआयशर चालकाने तातडीने ब्रेक लगावलाआयशरमध्ये लोखंडी सळ्या वाहून नेल्या जात होत्या. दोघा मयतांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही