गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:32+5:302021-01-08T04:43:32+5:30

घटनेची माहिती मिळताच, सातपूर केंद्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरित पाण्याचा मारा करत लागलेली आग विझविली. जखमींना ...

Five injured in gas leak | गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात पाच जखमी

गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात पाच जखमी

घटनेची माहिती मिळताच, सातपूर केंद्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरित पाण्याचा मारा करत लागलेली आग विझविली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

खुटवडनगर येथील पगार कुटुंबातील पुष्पा पगार या सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या नातवाला पेज तयार करून देण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला असता, घरात अगोदरच गॅसची गळती झालेली असल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, घरातील दरवाजे खिडक्या आणि भिंतीदेखील तुटल्या. खिडक्यांची तावदाने थेट अंगणात येऊन पडली होती, तसेच घराबाहेर असलेल्या वाहनांच्याही काचा फुटल्या आणि आजूबाजूंच्या घरांनाही हादरे बसल्याचे रहिवाशांनी सांगितले. या स्फोटात पुष्पा बळीराम पगार त्यांचे पती बळीराम पगार, तसेच मुलगा अतुल पगार, मुलगी अश्विनी पगार, तसेच नातू रोहन व रुची हे सर्व जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गॅस गिझरचा स्फोट होऊन युवक मृत्युमुखी पडला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Five injured in gas leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.