इंदिरानगर : गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय राहणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. एकूण सात गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रकाश दोंदे (रा. पाथर्डी), गणेश शिंदे (घरकुल प्रकल्प, वडाळा), हरिप्रसाद जोशी (कलानगर), फकिरा सावंत (सदिच्छानगर), प्रसाद कनकुटे (सदिच्छानगर) या पाच सराईत गुन्हेगारांना उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी तडीपार केले आहे. तसेच अकील पीरमंहमद शेख ऊर्फ बंटी, (रा. खंडोबा चौक, वडाळा), शौकत शहा (रा. सादिकनगर वडाळा), राकेश ऊर्फ पप्पू दोंदे (२८, पाथर्डी) विशाल ऊर्फ इंदा बंदरे (२८, रा. वडाळा), समीर ऊर्फनिजाम शेख (रा. जय मल्हार कॉलनी वडाळा), संकेत चंद्रात्रे (रा. पांडवनगरी) आदी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी कोकाटे यांच्याकडे प्रस्ताव इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून पाठविण्यात आले आहे.
पाच सराईत गुन्हेगार तडीपार; आणखी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:59 IST