पदव्युत्तर वैद्यकीयच्या पाचशे जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच

By Admin | Updated: May 12, 2017 18:05 IST2017-05-12T18:05:09+5:302017-05-12T18:05:09+5:30

महाजन : पुढील वर्षासाठी शासनाची रणनीती तयार

Five hundred seats for postgraduate degrees are for the students of the state | पदव्युत्तर वैद्यकीयच्या पाचशे जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच

पदव्युत्तर वैद्यकीयच्या पाचशे जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच

नाशिक : पुढील वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणक्रमांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पाचशे जागांवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने खासगी आणि अभिमत संस्थांमध्ये राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ६७.५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात काही पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देत प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अशाप्रकारचा निर्णय घेता येणार नाही असे नमूद केले होते. त्यामुळे राज्य शासनाची अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासन पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय उच्च शिक्षणाची संधी कशी मिळेल या दृष्टीने राज्य शासन रणनीती ठरवित असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

Web Title: Five hundred seats for postgraduate degrees are for the students of the state