पाच तास वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:05+5:302021-09-25T04:15:05+5:30
इंदिरानगर परिसरात महावितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव जणू काही सूत्रच बनले आहे. शुक्रवार (दि.२३) रोजी सकाळी साडेअकरा वाजेपासून सुमारे पाच ...

पाच तास वीजपुरवठा खंडित
इंदिरानगर परिसरात महावितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव जणू काही सूत्रच बनले आहे. शुक्रवार (दि.२३) रोजी सकाळी साडेअकरा वाजेपासून सुमारे पाच तास महारुद्र कॉलनी, अरुणोदय कॉलनी, मानस कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी जिल्हा परिषद कॉलनी चार्वाक चौक परिसर, पिंगळे चौक, दीपाली नगर, सुचिता नगरसह परिसरात विद्युतपुरवठा खंडित झाला होता. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन होत आहे परंतु परिसरात होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणाचे नुकसान होत आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
चौकट : महावितरण कंपनीच्या द्वारे देण्यात येणारी वीज देयके वेळोवेळी भरूनसुद्धा अद्यापपर्यंत परिसरातील विजेचा लपंडाव काही थांबत नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आम्ही शहरात राहतो की खेड्यात राहतो असा उपरोध प्रश्न केला आहे.