ब्राह्मणगाव येथे पाच शेळ्या चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 17:00 IST2018-11-05T17:00:09+5:302018-11-05T17:00:53+5:30

ब्राह्मणगाव : येथे गेल्या दोन तीन दिवसात पाच शेळ्या गावातून चोरीस गेल्याचे शेळी पालक संतप्त झाले आहेत. येथे दोन तीन महिन्यात शेळ्या चोरीचा प्रकार सतत घडत असून अद्याप या शेळी चोरट्यांचा बंदोबस्त न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Five goats stolen in Brahmanga Nagar | ब्राह्मणगाव येथे पाच शेळ्या चोरीस

ब्राह्मणगाव येथे पाच शेळ्या चोरीस

ठळक मुद्दे सततच्या या प्रकार मुळे शेळी पालक संतप्त झाले आहेत.

ब्राह्मणगाव : येथे गेल्या दोन तीन दिवसात पाच शेळ्या गावातून चोरीस गेल्याचे शेळी पालक संतप्त झाले आहेत. येथे दोन तीन महिन्यात शेळ्या चोरीचा प्रकार सतत घडत असून अद्याप या शेळी चोरट्यांचा बंदोबस्त न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
येथे काही दिवसात प्रदीप बबन खरे यांच्या दोन शेळ्या, अशोक गायकवाड यांच्या दोन शेळ्या, चैत्राम लोणारी यांची एक शेळी अशा पाच शळ्या गावातून लोकवस्तीतून चोरीस गेल्या आहेत. या आधीही गावातून दिवसा शेळ्या चोरीस गेल्या आहेत. सततच्या या प्रकार मुळे शेळी पालक संतप्त झाले आहेत. या शेळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेळी पालकांनी केली आहे.

Web Title: Five goats stolen in Brahmanga Nagar