तब्बल तेराशे फूट लांब, पाच फूट उंचीची पंचरंगी धर्मध्वजा फडकली
By Admin | Updated: April 3, 2015 01:25 IST2015-04-03T01:23:44+5:302015-04-03T01:25:16+5:30
तब्बल तेराशे फूट लांब, पाच फूट उंचीची पंचरंगी धर्मध्वजा फडकली

तब्बल तेराशे फूट लांब, पाच फूट उंचीची पंचरंगी धर्मध्वजा फडकली
नाशिक : तब्बल तेराशे फूट लांब, पाच फूट उंचीची पंचरंगी धर्मध्वजा फडकली अन् टाळ्यांच्या कडकडाटात आणखी एका जागतिक विक्रमाची नाशकात नोंद झाली. जैन सोशल ग्रुपच्या (प्लॅटिनम) वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त हा आगळा उपक्रम राबवण्यात आला. हा विक्रम ‘अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवण्यात आला.
यापूर्वी गुजरातमधील मेहसाना व चांदवड येथे असा विक्रम झाला होता; मात्र गुरुवारी यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढून जगातील सर्वांत लांब धर्मध्वजा तयार करण्याचा मान जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमने पटकावला. गेल्या तीन दिवसांपासून गंगापूररोड येथील चोपडा लॉन्स येथे ही महाकाय धर्मध्वजा तयार करण्याचे काम अकरा सदस्यांच्या चमूकडून सुरू होते. या चमूने तेराशे फूट लांब, पाच फूट उंच धर्मध्वजा दिवस-रात्र खपून तयार केली. त्यासाठी ८०० मीटर सॅटिनचे कापड व तब्बल २०० बांबूंचा वापर करण्यात आला. आज महावीर जयंतीनिमित्त गंगापूररोड येथील मॅरेथॉन चौकात सकाळी १० वाजता आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या हस्ते ही महाकाय धर्मध्वजा फडकावण्यात आली.