आरटीई प्रवेशासाठी उरले पाच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:46+5:302021-06-26T04:11:46+5:30
नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली ...

आरटीई प्रवेशासाठी उरले पाच दिवस
नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यास आता केवळ पाच दिवस उरले असून आतापर्यंत मागील १५ दिवसांत केवळ ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अजूनही तब्बल ३ हजार ५३१ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
नाशिक जिल्ह्यात आरटीई प्रवेशांतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे; परंतु आतापर्यंत केवळ ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, १ हजार २६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश प्राथमिक टप्प्यात आहेत. हे प्रवेश निश्चित झाले, तर उर्वरित २ हजार २७० विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत राज्यस्तरावरून सोडत जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याला विलंब झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे; पंरतु आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात असूनही प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
.
इन्फो-
आतापर्यंतचे प्रवेश
जिल्ह्यातील शाळा - ४५०
उपलब्ध जागा - ४,५४४
प्रवेशासाठी अर्ज - १३,३३०
लॉटरीत निवड - ४,२०८
प्रवेश निश्चित - ६७७