अभोण्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 19:34 IST2020-09-08T19:34:18+5:302020-09-08T19:34:50+5:30

अभोणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अभोणा शहरात मंगळवारपासून ( दि.८ते१३) रविवार पर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून या काळात शहरातील संपूर्ण व्यवहार बंद असणार आहेत.

Five-day public curfew in Abhon | अभोण्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

अभोण्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

ठळक मुद्देशहरातील संपूर्ण व्यवहार बंद

अभोणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अभोणा शहरात मंगळवारपासून ( दि.८ते१३) रविवार पर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून या काळात शहरातील संपूर्ण व्यवहार बंद असणार आहेत.
सदरचा निर्णय विविध व्यवसाय करणारे व्यापारी, सामाजिक कार्यकर्तें, ग्रामस्थ व ग्रामपालिका यांच्या समन्वयातून घेण्यात आला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा औषध दुकाने, दवाखाने, दुधपुरवठा यासेवा सुरु असतील. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Five-day public curfew in Abhon