येवल्यातील पाच कोरोेनामुक्त, चार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 00:55 IST2020-11-02T00:53:44+5:302020-11-02T00:55:24+5:30

येवला : तालुक्यातील ५ बाधित कोरानामुक्त झाले असून, शहरातील ४ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Five corona-free, four positive in Yeola | येवल्यातील पाच कोरोेनामुक्त, चार पॉझिटिव्ह

येवल्यातील पाच कोरोेनामुक्त, चार पॉझिटिव्ह

ठळक मुद्देआत्तापर्यंत एकूण ५० बाधितांचा बळी

येवला : तालुक्यातील ५ बाधित कोरानामुक्त झाले असून, शहरातील ४ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तालुक्यातील १९ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. या अहवालात ४ अहवाल पॉझिटिव्ह तर १५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये शहरातील टिळक मैदान भागातील ३० वर्षीय पुरुष, मामलेदार गल्ली भागातील ६७ वर्षीय पुरुष, मेनरोड भागातील ३६ वर्षीय पुरुष, गंगा दरवाजा भागातील ५१ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. नाशिक रुग्णालयातून एक बाधित तर होम क्वॉरंटाइन असणारे ४ असे एकूण ५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
तालुक्यातील एकूण बाधित रुग्णसंख्या १००९ झाली असून, आत्तापर्यंत ९४८ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर कोरोनाने आत्तापर्यंत एकूण ५० बाधितांचा बळी गेला आहे. सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह (बाधित) रुग्णसंख्या ११ आहे.

Web Title: Five corona-free, four positive in Yeola