मालगाडीचे पाच डबे घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:08 IST2020-02-16T18:07:28+5:302020-02-16T18:08:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लासलगाव : लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ बी टी सायिडंग या ठिकाणी रेल्वेची खळी वाहतूक करणार्या मालगाडीचे पाच डबे घसरले असल्याची घटना घडली. परंतु त्याचा मध्य रेल्वेच्या सेवेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याने त्याचा प्रवाशांना फारसा फटका बसला नाही. काल रविवार सकाळी आठ वाजेच्या सुमारास बी टी सायिडंग या ठिकाणी मालगाडीचे पाच डबे घसरले होते

मालगाडीचे पाच डबे घसरले
ठळक मुद्दे मालगाडीचे डबे घसरल्याचे समजल्यानंतर रेल्वे कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रु ळावरून घसरलेले मालगाडीचे डबे क्र ेन आण िपोकलंड च्या साहाय्याने उचलून सुरळीत रेल्वे रु ळावर ठेवले.
यावेळी कार्यकारी अभियंता रावसाहेब, सेक्शन इंजिनिअर सोनवणे, स्टेशन प्रबंधक सुरवाडे, रेल्वेचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर डी के जगताप, परिवहन निरीक्षक मनोज पिल्ले, सिनिअर सेक्शन इंजिनीअर राहुल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी मालगाडीचे घसरलेले डबे रेल्वे रु ळावर सुरळीत ठेवले.