पाच लाभार्थ्यांचा केला ई-गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:20+5:302021-06-17T04:11:20+5:30
पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, सदस्या सुमन बर्डे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. एस. चित्ते, ...

पाच लाभार्थ्यांचा केला ई-गृहप्रवेश
पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, सदस्या सुमन बर्डे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. एस. चित्ते, धनंजय डावरे, नवनाथ भाबड, सागर झाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महाआवास अभियान काळात ज्या लाभार्थ्यांनी घरकूल बांधकाम पूर्ण केले अशा ५ लाभार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली होती. यात प्रधानमंत्री आवास योजनेतील खंबाळे येथील विठ्ठल नामदेव आंधळे, कोमल पांडुरंग आंधळे, रघुनाथ नारायण आंधळे, रमाई आवास योजनेतील फर्दापूर येथील राहुल विठ्ठल शिंदे, शबरी आवास योजनेतील वडझिरे येथील नवनाथ तुकाराम कुंवर यांचा समावेश होता.
इन्फो
विभागस्तरावरही आयोजन
विभागीय स्तरावर नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या सोहळ्यात शबरी आवास योजनेतील वडझिरे येथील रामदास दत्तू आंबेकर आणि जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सोहळ्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील मोह येथील मीराबाई लहानू सदगीर, घोरवड येथील शहाजी भिमाजी माळी यांचा ई-गृहप्रवेश करण्यात आला.
फोटो - १६ सिन्नर पंचायत
सिन्नर पंचायत समितीत घरकूल योजनेतील लाभार्थ्याला चावी देऊन ई-गृहप्रवेश करताना गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे. समवेत सदस्य जगन पाटील भाबड, सुमन बर्डे आदी.
===Photopath===
160621\16nsk_30_16062021_13.jpg
===Caption===
फोटो - १६ सिन्नर पंचायत सिन्नर पंचायत समितीत घरकुल योजनेतील लाभार्थ्याला चावी देऊन ई-गृहप्रवेश करताना गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे. समवेत सदस्य जगन पाटील भाबड, सुमन बर्डे आदी.