‘स्थायी’ समिती सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिलेला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:46 IST2018-03-15T14:46:39+5:302018-03-15T14:46:39+5:30
नाशिक महापालिका : भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडकेंना उमेदवारी

‘स्थायी’ समिती सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिलेला संधी
नाशिक - महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिला विराजमान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांनी गुरूवारी (दि.१५) उमेदवारी अर्ज दाखल केला तर विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे, दोन महिलांमध्ये सरळ सामना होणार असला तरी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने हिमगौरी अहेर-आडके यांची निवड निश्चित आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी येत्या शनिवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी, गुरूवारी (दि.१५) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, सत्ताधारी भाजपाकडून प्रभाग ७ मधील नगरसेवक हिमगौरी अहेर-आडके यांनी नगरसचिव राजेंद्र गोसावी यांच्याकडे सादर केला. हिमगौरी अहेर यांनी तीन अर्ज दाखल केले. सूचक-अनुमोदक म्हणून त्यांच्या अर्जावर महापौर रंजना भानसी, भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर, शांता हिरे, गणेश गिते, हेमंत शेट्टी, जगदीश पाटील यांच्या स्वाक्षºया आहेत. अहेर यांचा अर्ज दाखल करण्यात आला,त्याप्रसंगी महापौरांसह उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे, जगदीश पाटील, मच्छिंद्र सानप आदी उपस्थित होते. त्यापूर्वी, विरोधकांच्यावतीने शिवसेनेच्या संगीता अमोल जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला. जाधव यांचे दोन अर्ज सादर करण्यात आले. त्यांच्या अर्जावर सूचक-अनुमोदक म्हणून कॉँग्रेसचे समीर कांबळे व सेनेचे प्रवीण तिदमे, भागवत आरोटे व संतोष साळवे यांच्या स्वाक्ष-या आहेत. जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला, त्याप्रसंगी विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते, शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, राष्टवादीचे गटनेता गजानन शेलार आदी उपस्थित होते. स्थायी समितीवर भाजपा ९, शिवसेना ४, कॉँगे्रेस १, राष्टवादी १ आणि मनसेच्या कोट्यातील अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. येत्या शनिवारी (दि.१७) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.