शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

 सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सवाची परंपरा पहिल्यांदाच खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:20 IST

नाशिक : उत्तर महाराष्टÑााची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे र्पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर घटस्थापना करून आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून पूजाविधीला सुरुवात झाली. महावस्र व देवीच्या अलंकारांचे पूजन करून साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देकोरोनाचे सावट : जिल्ह्यात आदिमायेचा जागर

नाशिक : उत्तर महाराष्टÑााची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे र्पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर घटस्थापना करून आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून पूजाविधीला सुरुवात झाली. महावस्र व देवीच्या अलंकारांचे पूजन करून साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली. यंदा कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक नवरात्रोत्सव रद्द करण्यात आल्याने पहिल्यांदाच परंपरा खंडित झाली.कोरोनामुळे नवरात्रोत्सवासाची परंपरा खंडित झाल्याने भाविकांच्या जयघोषाने दुमदुमणारा मंदिर परिसरास सर्वत्र शांतता दिसून आली. मंदिरात गडावरील रहिवासी तसेच देवीभक्तांना घटस्थापना, महापूजा आदी धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहण्यास प्रशासनाने बंदी केल्यामुळे देवीभक्तांनी नाराजी व्यक्त केली. नवरात्रोत्सव घटस्थापना, अलंकार पूजा, धार्मिक विधी अत्यंत साध्या पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवत करण्यात आले. पुरोहितवर्गाने पारंपरिक पद्धतीने देवीची पंचामृताने महापूजा केली. त्यानंतर भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली. ट्रस्टच्या कार्यालयात अलंकारांची पूजा पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते करण्यात येऊन अलंकारांची मिरवणूक काढण्यात आली. नवरात्रोत्सव काळातील नियमित धार्मिक विधी, होमहवन पूजा, कीर्तिध्वजपूजन व ध्वजारोहण, दसरा उत्सव आदी कार्यक्रम कोरोनासंदर्भातील अत्यावश्यक नियमावली पाळून व नेमून दिलेल्या पुरोहितांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.

 

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरNavratriनवरात्री