दुर्गम वाळविहीर गावाला प्रथमच बसचे दर्शन

By Admin | Updated: August 6, 2014 00:50 IST2014-08-05T21:45:15+5:302014-08-06T00:50:33+5:30

दुर्गम वाळविहीर गावाला प्रथमच बसचे दर्शन

The first time the bus appeared in the deserted village | दुर्गम वाळविहीर गावाला प्रथमच बसचे दर्शन

दुर्गम वाळविहीर गावाला प्रथमच बसचे दर्शन


घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर हे वैतरणा रस्त्यावरील पश्चिम पट्ट्यातील शेवटचे अत्यंत दुर्गम गावात स्वातत्र्यानंतर पहिल्यांदाच एस. टी. सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. घोटी, इगतपुरीला जाण्यायेण्याची गैरसोय दूर व्हावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे.
गावातील रस्ताच भाम धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने एस.टी चे दर्शन होण्याच्या आशा धुसर झाल्या होत्या. परंतु शासनाने या गावाला धार्नोली, शिंदेवाडी, पिंपळगाव भटाटा, गांगडवाडी, मारुतीची वाडी या मार्गाने पर्यायी रस्ता केल्याने पुन्हा एकदा या ग्रामस्थांच्या एस.टी.बाबतच्या आशा पल्लवित झाल्या. याबाबत ग्रामपंचायतीने परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करून या गावासाठी एस.टी सुरु करण्यास भाग पाडले. एस.टी.मुळे या भागातील शेकडो आदिवासी नागरिक आणि विद्यार्थ्यांचा प्रवासाचा प्रश्न सुटणार आहे. इगतपुरी आगाराकडून वाळविहीर गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली असून, या बससेवेचे धार्नोली, शिंदेवाडी, पिंपळगाव भटाटा, गांगडवाडी,
मारुतीची वाडी आदि गावांना लाभ होणार आहे. या एस.टी.चे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली.

Web Title: The first time the bus appeared in the deserted village