शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

सत्ता गमावल्यानंतर प्रथमच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 7:26 PM

मनसे सूत्रांची माहिती : संघटनात्मक फेरबदल शक्य

ठळक मुद्देयेत्या १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी नाशिकला गेल्या आठ महिन्यांत पाऊल ठेवले नाही

नाशिक : महापालिका निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर आठ महिन्यांनी पहिल्यांदाच मनसेचे प्रमुख राज ठाकरे पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याबरोबरच संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, राज यांच्या उपस्थितीत पक्ष सोडून गेलेल्या काही माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्याची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिका निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांची १७ फेबु्रवारी २०१७ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा झाली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीत मनसेला सपाटून मार बसल्याने पक्षाचे अवघे पाच नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी नाशिकला गेल्या आठ महिन्यांत पाऊल ठेवले नव्हते. मध्यंतरी दोन-तीन वेळा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगितले जायचे परंतु, राज यांच्या दौऱ्याला काही केल्या मुहूर्त लागत नव्हता. महापालिका निवडणुकीनंतर राज यांनी मुंबईतील सभेत बोलताना ‘आता पुन्हा पराभव पाहायचा नाही’ असे सांगत हताश झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले होते. परंतु, नंतरच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेला अपयशच पहावे लागले होते. सततच्या पराभवाने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य येण्यासाठी गेल्या महिन्यात राज यांनी मुंबईत काढलेला मोर्चा पूरक ठरला. त्यानंतर रेल्वेस्थानकाजवळील फेरीवाल्यांचाही प्रश्न उपस्थित करत मनसेने पुन्हा एकदा आपले अस्तित्व दर्शविण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यात राज यांनी कल्याण-डोंबिवली याठिकाणी दौरे करून स्थानिक प्रश्नांनाही हात घालण्यास सुरुवात केली आहे. आता आपला बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या  नाशिककडे राज यांनी लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, येत्या १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे. या दौऱ्यात राज हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, संघटनस्तरावर फेरबदलाचेही संकेत मिळत आहेत.पक्ष सोडून गेलेल्यांना ‘नो एण्ट्री’मनसेची सध्याची स्थिती पाहता पक्ष बळकटीकरणासाठी यापूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा परत घेण्याची मागणी पक्षपातळीवर होऊ लागली असताना राज यांनी मात्र, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश देण्यास साफ नकार दिल्याचे समजते. त्यामुळे, मनसेत येऊ इच्छिणाऱ्याच्या घरवापसीला ब्रेक लागणार आहे. दरम्यान, काही माजी नगरसेवक पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे पक्षातीलच काही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNashikनाशिक