पिंपळगाव बसवंत महाविद्यालयास विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 17:24 IST2022-04-18T17:23:14+5:302022-04-18T17:24:03+5:30
पिंपळगाव : येथील महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस दौंड आणि प्राध्यापक विक्रम जाधव (रसायनशास्त्र विभाग) यांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

विद्यार्थी तेजस दौंड आणि प्रा. विक्रम जाधव यांचा सत्कार करताना प्राचार्य दिलीप शिंदे, प्रा. बी. एन. कडलग, प्रा. ए. एम. भगरे, प्रा. अनंत कर्डेल, आदी.
पिंपळगाव : येथील महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस दौंड आणि प्राध्यापक विक्रम जाधव (रसायनशास्त्र विभाग) यांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
ही स्पर्धा के. के. वाघ पॉलिटेक्निक या महाविद्यालयाने आयोजित केली होती. त्यामध्ये, ह्यएक स्वयंचलित पॉलिहाउस संरचनाह्ण यावरील संशोधन, सादरीकरण तेजस दौंड व प्रा. विक्रम जाधव यांनी केले. त्यासाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे.
पारितोषिकाचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख ५००० रुपये असे असून या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बी. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. एन. अहिरे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे प्रमुख प्रा. बी. एन. कडलग, प्रा. एन. यू. पाटील, रसायनशास्त्राचे प्राध्यापक ए. एम. भगरे, प्रा. अक्षय धायगुडे, प्रा. अनंत कर्डेल यांनी अभिनंदन केले.