आजपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:24 AM2019-08-21T01:24:14+5:302019-08-21T01:24:40+5:30

अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेºया पार पडल्यानंतर विशेष फेरीअंती १६ हजार ५८३ विद्यार्थ्यांचे आॅनलाइन पद्धीतीने प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित सात हजार २७७ जागांसाठी बुधवारपासून (दि.२१) ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ या नियमानुसार खुल्या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

First priority to come first today | आजपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

आजपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

Next
ठळक मुद्देअकरावी प्रवेश : शेवटच्या टप्प्यात खुल्या पद्धतीने प्रक्रिया

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेºया पार पडल्यानंतर विशेष फेरीअंती १६ हजार ५८३ विद्यार्थ्यांचे आॅनलाइन पद्धीतीने प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित सात हजार २७७ जागांसाठी बुधवारपासून (दि.२१) ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ या नियमानुसार खुल्या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार
आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रातील १४६ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २३ हजार ८६० जागांसाठी आत्तापर्यंत १६ हजार ५८३ विद्यार्थ्यांचे आॅनलाइन पद्धीतीने प्रवेश निश्चित झाले
असून, शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये आता इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यमाच्या मिळून सुमारे सात हजार २७७ जागा रिक्त
आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रवेशप्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार शेवटची फेरी राबविली जात आहे.
यात पहिल्या टप्प्यात ८० टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना, त्यानंतर ६० टक्क्यांहून अधिक व तिसºया टप्प्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, आयसीएसई बोर्डाच्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचे गुण एकूण पाचशे गुणांच्या तुलनेत बदलले नाहीत. मात्र त्यांना प्रवेशप्रक्रियेत भाग घ्यायचा
आहे.
अशा विद्यार्थ्यांना त्यांचे गुण एकूण पाचशे गुणांच्या तुलनेत बदलून घेणे अनिवार्य असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
शाखानिहाय रिक्त जागा
नाशिक महापालिका क्षेत्रातील १४६ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २३ हजार ८६० जागांपैकी तीन नियमित व एका विशेष फेरीनंतर सुमारे ७ हजार २७७ जागा रिक्त असून, यात कला शाखेतील मराठी माध्यमाच्या १ हजार ४४७, इंग्रजी माध्यमाच्या १५२ व उर्दू माध्यमाच्या ३४ जागांचा समावेश आहे, तर वाणिज्य शाखेतील मराठीच्या ८०९ , इंग्रजीच्या १ हजार १५६ व उर्दु माध्यमातील केवळ दोन जागा रिक्त आहे. विज्ञान शाखेच्या मराठी माध्यमाच्या ६८, इंग्रजीच्या २ हजार ८९० जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.

Web Title: First priority to come first today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.