पिंपळगावला पहिला रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:17 IST2020-06-18T21:44:44+5:302020-06-19T00:17:43+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पिंपळगावला पहिला रुग्ण कोरोनामुक्त
पिंपळगाव बसवंत : येथील पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दि. ६ जून रोजी शहरात पहिला ३४ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधिक सापडली होती. प्रशासनाने गंभीर दखल घेत खबरदारी म्हणून व्यापार भवन व परिसर सील केला. सदर कोरोना रुग्ण पुढील उपचारासाठी लासलगाव कोरोना सेंटर येथे पाठवण्यात आला होता. सदरचा रुग्ण हा दि. १८ रोजी पूर्णपणे बरा होऊन घरी परतला. यावेळी फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी निफाडचे आमदार दिलीप बनकर, गणेश बनकर, संजय मोरे, बाळासाहेब बनकर, सुरेश खोडे, लिंगराज जंगम, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. शहरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या आठवर पोहचली आहे.