प्रथम नमो गौतमा चला हो!

By Admin | Updated: May 11, 2017 02:29 IST2017-05-11T02:28:29+5:302017-05-11T02:29:13+5:30

पाथर्डी फाटा : अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती येथील बुद्ध स्मारकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

First Namo Gautama is running! | प्रथम नमो गौतमा चला हो!

प्रथम नमो गौतमा चला हो!

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथर्डी फाटा : अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती येथील बुद्ध स्मारकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपासक, उपासिकांनी स्मारकात बुद्ध मूर्तीला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त स्मारक परिसरात दिवसभर विविध धार्मिक व उद्बोधनपर कार्यक्र म झाले. प्रारंभी स्मारक परिसरात बुद्ध पौर्णिमा : फाळके स्मारकाजवळील बुद्ध स्मारकातील बुद्ध मूर्तीला वंदन करणारे भन्तेजी. तर दुसऱ्या छायाचित्रात स्मारकाबाहेर जमलेल्या उपासक, उपासिकांनी सामूहिक बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.

Web Title: First Namo Gautama is running!