मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअरिंग गटात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:36 IST2019-03-23T00:36:35+5:302019-03-23T00:36:56+5:30

महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या वतीने सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

First in the MVP Engineering College Engineering Group | मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअरिंग गटात प्रथम

मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअरिंग गटात प्रथम

नाशिक : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या वतीने सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या तंत्र प्रदर्शनात जिल्ह्यातील २१ संस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मविप्र समाज संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रोहित काळे, अनिकेत गांगुर्डे, रोहित पवार, आकाश खर्जूल व लखन मांझी यांनी बनविलेल्या अ‍ॅटोमॅटिक ट्रॅफिक सिग्नल फॉर इमर्जन्सी वेव्हीकल या प्रकल्पास इंजिनिअरिंग गटात प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी सहसंचालक राजेश मानकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एम. लाडसावंगीकर , एस. डी. नलावडे यांच्या हस्ते चषक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नानासाहेब महाले,  सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी आयटीआयचे  प्राचार्य आर. बी. पाटील, गटनिदेशक एस. के. चौधरी, एस. एस. ढोकरे, श्रीमती सुर्वे, निदेशक सचिन मोरे, संधान, कडलग, देसले, माळोदे, जाधव, भुसारे, खालकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: First in the MVP Engineering College Engineering Group