विशेष फेरीत ३२६६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:59+5:302021-09-23T04:17:59+5:30

नाशिक : शहरातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेंतर्गत प्रथम विशेष तथा नियमित ...

First choice college for 3266 students in special round | विशेष फेरीत ३२६६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

विशेष फेरीत ३२६६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

Next

नाशिक : शहरातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेंतर्गत प्रथम विशेष तथा नियमित चौथ्या फेरीसाठी बुधवारी (दि. २२) गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आली. त्यानुसार ३ हजार २६६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालयात प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.

अकरावी प्रवेशासाठी प्रथम विशेष फेरीसाठी उपलब्ध १० हजार ६९३ जागांसाठी ५ हजार ६ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ४ हजार ४८४ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले असून, यात ३ हजार २६६ विद्यार्थ्यांना प्रथम, ६१७ विद्यार्थ्यांना द्वितीय व उर्वरित विद्यार्थ्यांना ३ ते १० पसंतीच्या महाविद्यालयातील जागा मिळाल्या आहेत. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.२५) सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.

नाशिक मनपा क्षेत्रात उपलब्ध जागा

महाविद्यालये - ६०

उपलब्ध जागा - २५,३८०

प्रवेशासाठी नोंदणी - २४,६६१

अर्ज निश्चित - २२,३८८

अर्ज पडताळणी - २२,३२१

पर्याय निवडले- १७,३५३

प्रवेश निश्चित - १३,५४७

रिक्त जागा ११,८३३

Web Title: First choice college for 3266 students in special round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.