शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नाशिक जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ, निसर्ग प्रेमी छायाचित्रकार डॉ. विनय ठकार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 9:53 AM

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त मंडळ सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे आज नाशिक मधील संस्थेच्या सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.

नाशिक- जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ, निसर्ग प्रेमी छायाचित्रकार आणि अनेक संस्थांचे आधारस्तंभ डॉ विनय ठकार यांचे अल्पशा आजाराने आज मध्यरात्री निधन झाले ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रतिभा आणि एक मुलगा व मुलगी असा परिवार असून  त्यांचे सुपुत्र डॉ चारुहास ठकार हे अमेरिकेत सिनसिनाटि विद्यापीठात जगप्रसिध्द किडनी विकार तज्ञ आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

डॉ विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात  अनेक आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. निष्णात हृदयरोग तज्ञाबरोबरच ते उत्तम छायाचित्रकार होते. त्यांच्या संग्रहात लक्षावधी फोटो होते. मुलांमध्ये निसर्गप्रेम वाढावे म्हणून शेकडो स्लाईड शो केले.  त्यासाठी संपूर्ण अनेक देशांत प्रवास केला होता. नाशिक मधील पक्षीमित्र आणि वन्यजीव प्रेमी म्हणूनही ते सुपरिचित होते.नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. नाशिक एज्युकेशन  सोसायटीचे ते विश्वस्त मंडळ सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे आज नाशिक मधील संस्थेच्या सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक