पहिली घंटा वाजली...शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:19 AM2019-06-18T01:19:56+5:302019-06-18T01:20:31+5:30

उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीत आनंदोत्सव साजरा केल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसह नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे नाशिकमधील विविध शाळांनी वाजतगाजत स्वागत केले. शाळेत येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यासोबत वर्ग पताका आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते.

 The first bell happened ... again in the schools twitter | पहिली घंटा वाजली...शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

पहिली घंटा वाजली...शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

Next

नाशिक : उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीत आनंदोत्सव साजरा केल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसह नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे नाशिकमधील विविध शाळांनी वाजतगाजत स्वागत केले. शाळेत येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यासोबत वर्ग पताका आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच आपल्या आई-बाबांपासून दूर जाऊन शाळेत येणाºया चिमुकल्यांना शाळा आपलीशी आणि हवीहवीशी वाटावी यासाठी शिक्षकांनी गुलाबपुष्प आणि गोड खाऊ देत प्रवेशोत्सव साजरा करीत विद्यार्थ्यांचा पहिला दिवस खास बनवला.
शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षास २०१९-२० सोमवारी (दि.१७) पासून सुरुवात झाली असून नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या ९०, अनुदानित ८१, विनाअनुदानित ३१ प्राथमिक शाळांसह कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य ११९ व जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ३२४ शाळांमध्ये पहिल्या दिवसापासूनच ‘नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत’ असे फलक शाळांबाहेर लावण्यात आले होते.
लावून तसेच शाळेचे प्रवेशद्वार रांगोळी व फुलांनी सजवून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नाएसोच्या उंटवाडीसारख्या काही शाळांनी तर चक्क वाजतगाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर बहुतांश ठिकाणी लेजीम पथक, जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा केली. पहिल्या दिवशी देशभक्तीपर गीते, प्रभातफेरी, विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व खाऊसोबत मोफत पाठ्यपुस्तक ांचेही वाटप करण्यात आले. नवे शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून समग्र शिक्षा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये ३० जूनपर्यंत प्रवेशोत्सव सुरू राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येत आहे. २५ जून रोजी गावात शाळाबाह्य मुलांच्या भेटीचे आयोजन, २५ ते २९ जून रोजी प्रत्यक्ष पालकांच्या गृहभेटी करण्यात येणार आहे. १ जुलै रोजी पटनोंदणी पंधरवड्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर केली जाणार आहे.
चिमुकल्यांच्या हुंदक्यांनी पालक झाले भावुक
कुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. वर्गात नानाविध खेळण्यांचा पसारा आणि खाऊचीही रेलचेल.. पण तरीही प्रथमच शाळेत आलेल्या चिमुकल्यांना आई-बाबांचे बोट सोडवत नव्हते. पाल्याला सोडण्यासाठी शाळेत आलेले पालक आपल्या चिमुकल्याच्या हुंदक्यांनी भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या पाल्याची समजूत काढताना कसरत करावी लागली. चिमुकल्यांना शिक्षकांच्या हाती सोपवत पालक माघारी फिरत असताना अनेकजण हमसून हमसून रडत होते. एका बाजूला नवे मित्र, नवे शिक्षक, नवा वर्ग मिळण्याच्या आनंद तर दुसºया बाजूला मनात अनामिक भीती असे संमिश्र चित्र सोमवारी वेगवेगळ्या प्राथमिक शाळांच्या प्रांगणात पहायला मिळाले.
दीड महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी जिल्हाभरातील शाळांमध्ये पुन्हा एकदा बालगोपाळांचा किलबिलाट सुरू झाला. महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांना पुष्पगुच्छ देऊन नवगतांचे स्वागत करण्यात आले. तर काही शाळांनी फळा सजवून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गाणी-गोष्टी, विविध खेळ घेण्यात आले.

Web Title:  The first bell happened ... again in the schools twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.