अपघातानंतर प्रथमोपचारच ठरतो रुग्णांसाठी जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:49 AM2019-09-14T00:49:36+5:302019-09-14T00:50:14+5:30

प्रथमोपचार हे आजच्या धकाधकीच्या जीवनात आवश्यक गोष्ट ठरत आहेत. पूर्वीपेक्षा प्रथमोपचारात काळानुरूप काही बदल झालेले आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यात सध्या अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही.

 First aid is the life support for patients after an accident | अपघातानंतर प्रथमोपचारच ठरतो रुग्णांसाठी जीवनदान

अपघातानंतर प्रथमोपचारच ठरतो रुग्णांसाठी जीवनदान

Next

नाशिक : प्रथमोपचार हे आजच्या धकाधकीच्या जीवनात आवश्यक गोष्ट ठरत आहेत. पूर्वीपेक्षा प्रथमोपचारात काळानुरूप काही बदल झालेले आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यात सध्या अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही. अपघातानंतर लगेच मिळालेला प्रथमोपचार अगदी मोलाचा ठरतो तसेच कोणत्याही आजारात रुग्णांना प्रथमोपचाराची नितांत गरज लक्षात घेता याविषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
सामान्य नागरिकांना याबद्दल पूर्ण माहिती असणे महत्त्वाचे ठरते. यामुळे रुग्णांचे जीव वाचविण्यास मोठी मदत होऊ शकते, असे मत शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी शनिवारी (दि. १४) होणाऱ्या प्रथमोपचार दिनाच्या पाार्श्वभूमीवर व्यक्त केले.
जर एखाद्याने अपघातग्रस्त व्यक्तीस त्याची जखम ओळखून त्याला डॉक्टरकडे नेण्यापर्यंत विशिष्ट प्रथमोपचार केल्यास त्या व्यक्तीस जीवनदान मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही प्रथमोपचाराविषयी पूर्ण माहिती असणे आवश्यक ठरते. यात सर्पदंश, हृदयरोग, भाजणे, डायबेटिस, कुत्रा चावणे, खरचटणे, हाड मोडणे, रक्तस्त्राव, चक्कर आदी आजारांत प्रथमोपचार केल्यास रुग्णांना जीवनदान देण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. प्रत्येक ठिकाणी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक ठरते. यामुळे तत्काळ मदत मिळण्यास मोठी मदत होते व रुग्णांना जीवनदान देण्यात यश येऊ शकते.
कोणत्या आजारात कसा करावा प्रथमोपचार
अपघात : अपघात झाल्यास बºयाचदा जखमीची पडजीभ मागे पडते आणि श्वास घेण्यास अडचण येते, त्यामुळे त्याची मान सरळ करावी, रक्तस्त्राव होत असल्यास बॅँडेज बांधावे, हाड मोडले असल्यास असा भाग स्थिर व्हावा यासाठी आधार देऊन संबंधितास मदत करणे.
सर्पदंश : सर्पदंश झालेल्या भागाला साबणाने किंवा जंतुनाशक औषधाने त्याला साफ करावे. यानंतर दंक्ष झालेल्या भागाच्या वरती पट्टी किंवा रस्सीने घट्ट बांधावे जेणेकरून विष पूर्ण शरीरात पसरणार नाही व डॉक्टरांना उपचार करण्यास सोपे होईल.
विद्युत धक्क्याने हृदयविकार झटका : कृत्रिम हृदयक्रि या हा प्रकार यामध्ये उपयुक्त ठरतो. यामध्ये रुग्णाच्या छातीवर मसाज करावी व तोंडाने श्वास द्यावा. त्यानंतर छातीवर हाताने दाब द्यावा.
उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने आपली नियमित घेण्यात येणारी गोळी नेहमी सोबत ठेवावी. ज्यावेळी अचानक भोवळ किंवा मेंदूत रक्तस्त्राव होईल यावेळी गोळी घेतल्यास आराम मिळू शकतो.
पाण्यात बुडणे : सुरुवातीला पाण्यात बुडालेल्या व्यक्तीस बाहेर काढून त्याच्या छातीवर दाब देऊन छाती, पोटातील पाणी बाहेर काढावे त्यांनतर कृत्रिम श्वसनासाठी त्या व्यक्ती तोंडाने श्वास द्यावा.
कुत्रा चावणे : चावलेल्या ठिकाणाला सुरुवातीला साबणाने स्वच्छ धुवावे तसेच चावलेल्या भागाच्या वरील बाजूस पट्टी किंवा दोरीने घट्ट बांधावे.
कोठे असायला हवी प्रथमोपचार पेटी
सध्या अपघाताचे प्रमाण वाढले असून, यासाठी शहरातील प्रत्येक चौकात प्रथमोपचार पेटी असायला हवी तसेच महामार्गावर काही विशिष्ट ठिकाणांवर पेटी असणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे एसटी बस, खासगी बस, शासकीय तसेच खासगी कार्यालये, रेल्वे, शाळा, शाळेतील बस, मॉल्स, हॉटेल्स यांसारख्या सर्वच ठिकाणी प्रथमोपचार पेटी असणे महत्त्वाचे आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रथमोपचार पेटी दिसून येत नाही आणि असेल तर ती पूर्णपणे रिकामी असते. त्यामुळे याकडे महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्यावर कोणत्याही क्षणी कुठलीही आपत्ती ओढावू शकते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रथमोपचाराची व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. आपले जसे आधारकार्ड आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाला शासनाने मेडिकल कार्ड देणे गरजेचे आहे. त्यात रुग्णांच्या प्रमुख आजाराची, रक्तगटाची माहिती असायला हवी. - डॉ. मंगेश थेटे, माजी अध्यक्ष, आयएमए

Web Title:  First aid is the life support for patients after an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.